Anuradha Vipat
विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.
या दिवशी घरात सुख, समृद्धी आणि विजयाचे आगमन व्हावे यासाठी शास्त्राधारित पूजा केली जाते.
घरात अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने दसऱ्याची पूजा कशी करावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
झेंडूची फुले, आंब्याची पाने, आपट्याची पाने, शमीची पाने, तांदूळ, हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ व नैवेद्य, घरात वापरली जाणारी शस्त्रे, पूजनीय पुस्तके, व्यावसायिक अवजारे, आणि वाहनांची चावी.
स्नान करावे. घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे सुंदर तोरण लावावे. प्रवेशद्वारासमोर कलश किंवा स्वस्तिकाची रांगोळी काढावी. एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यावर घरातील शस्त्रे, वाहनांची चावी, अभ्यासाची पुस्तके या सर्व वस्तूंना हळद-कुंकू वाहावे, अक्षता आणि झेंडूची फुले अर्पण करावीत.
शमीच्या पानांचे पूजन केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि व्यवसायात विजय मिळतो. या पानांना अक्षता आणि फुले वाहून नमस्कार करावा.
दिवा आणि अगरबत्ती लावून संपूर्ण पूजेला ओवाळावे. गणपती बाप्पा, कुलदेवी आणि प्रभू श्रीरामांचे स्मरण करून आरती करावी. पूजेला गुळ-खोबरे किंवा घरी बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी मिळून प्रार्थना करावी.