Roshan Talape
हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी काही साध्या पण प्रभावी टिप्स आहेत. ज्यामुळे आपल्याला उबदार राहता येईल. या टिप्सने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि थंडी कमी जाणवते.
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला उबदारता मिळते, ज्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते.
स्वेटर्स, शाली, मफलर, टोपी, आणि हातमोजे वापरा, थंडीपासून संरक्षण मिळेल.
दिवसभर गरम किंवा कोमट पाणी प्या, यामुळे उबदारता टिकेल.
सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसा, यामुळे नैसर्गिक उबदारता मिळेल.
गरम चहा, कॉफी, हळदीचे दूध किंवा सूप प्या, यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत मिळते.
खिडक्या बंद ठेवा, इलेक्ट्रिक हिटर किंवा ब्लँकेटचा वापर करावा.
आहारात ड्रायफ्रूट्स, मध, आले, लसूण आणि मसाले यांचा समावेश करा.
हलका व्यायाम आणि योगा केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि उबदारता टिकते.