Roshan Talape
सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचा त्वचेतील मेलेनिन नावाचा रंगद्रव्य वाढतो. त्यामुळे त्वचा गडद किंवा तपकिरी दिसते, यालाच टॅनिंग म्हणतात; हे टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊयात!
काकडीचा रस टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावल्यामुळे त्वचेला शीतलता मिळते आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
टोमॅटो मॅश करून तो चेहऱ्यावर १५ मिनिटं लावल्याने टोमॅटोमध्ये असलेला लाइकोपीन त्वचेला शांत करून टॅन कमी करतो.
झोपण्यापूर्वी टॅन झालेल्या त्वचेवर ताजी कोरफडीचा जेल लावावा. कोरफड त्वचेला पुनर्जीवित करून टॅन कमी करण्यास मदत करते.
लिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण करुन त्वचेवर २० मिनिटं लावून ठेवावे. यातील लिंबामुळे त्वचा उजळते, तर मध त्वचेचं पोषण करते आणि त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत मिळते.
दही आणि बेसन एकत्र करा. हा लेप टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होईपर्यंत ठेवा. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होईल.
चंदनात थंडाव्याचे गुणधर्म असतात तर गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करून नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. या मिश्रणामुळे त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत होते.
बटाट्याचा रस लावल्यास त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत होते. बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा उजळते