Mahesh Gaikwad
अननसामध्ये नैसर्गिकत: साखर असते, ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. उन्हाळ्यात थकवा घालवण्यासाठी अननस हे उत्तम फळ आहे.
अननसामध्ये ब्रॉमेलन हे एंजाइम असते. जे अन्न पचवण्यास मदत करते. परिणामी अपचनाची समस्या होत नाही.
अननसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
अननसामधील व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळते. तसेच अकाली वृध्दत्वाची लक्षणे कमी होतात.
हाडांच्या मजबुतीसाठी अननस फायदेशीर आहे. यामध्ये मॅंगनीज हे खनिज असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
अननसातील ब्रॉमेलन एंजाइम हा घटक सांधेदुखीच्या रुग्णांमधील सूज आणि दाह कमी करण्यासाठी फायदेशीर असतो.
अननसामध्ये कॅलोरी कमी आणि फायबर जास्त असतात. यामुळे पोट भरल्यासारखं वाटते आणि वजन कमी करण्यातही मदत होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.