Humani Control : उसातील हुमणीला असं करा कंट्रोल

Team Agrowon

हुमणी भुंगेरे जमिनीत सुप्तावस्थेत राहतात आणि मातीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यावर बाहेर पडतात. प्रौढ भुंगेरे बाहेर पडण्यासाठी मातीमध्ये २० ते २३ टक्के ओलावा पुरेसा होतो.

Humani Control

पहिल्या पावसानंतर हुमणी बाहेर येते. या वर्षी एप्रिल महिन्याआधीच काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे भुंगेरे बाहेर पडल्याची शक्यता आहे. जमिनीतील उष्णता आणि ओलावा संतुलित झाल्यास भुंगेरे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.

Humani Control | Agrowon

ऊस पिकामध्ये नांगरट करण्यापूर्वी, मेटाऱ्हायझियम एकरी ४ ते ८ किलो प्रमाणे शेणखतात मिसळावे. हे मिश्रण दोन दिवस पाणी मारून झाकून ठेवून नंतर शेतामध्ये समानरीत्या पसरवावे.

Sugarcane Water Management | Agrowon

सऱ्या पाडलेल्या असल्यास, शेणाची स्लरी करून मेटाऱ्हायझियम १ किलो एकरी मिसळून आळवणी करावी.

Humani Control | Agrowon

उगवणीनंतर, १५ लिटर पंपाच्या पाण्यात १०० ग्रॅम मेटाऱ्हायझियम मिसळून नोझल काढून आळवणी करावी.

Humani Control | Agrowon

मोठी भरणी झाल्यानंतर, १५ दिवसांनी पाडेगाव पहारीने वापश्यावर प्रति एकर १ किलो मेटाऱ्हायझियम प्रमाणे तिरक्या नाळेने नोझल काढून आळवणी करावी.

Humani Control

खोडवा उसासाठी, १५ दिवसांच्या अंतराने वाफशावर २ वेळा तिरक्या नाळेने नोझल काढून प्रति एकर १ किलो मेटाऱ्हायझियम आळवणी करावी.

Humani Control | Agrowon

Food Processing Business : प्रक्रिया उद्योगासाठी कसं मिळवाल कर्ज आणि अनुदान? काय आहेत नियम, अटी आणि पात्रता

आणखी पाहा...