Mahesh Gaikwad
निरोगी शरीराराठी बऱ्याचदा संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये हुलगे म्हणजेच कुळीथ याचाही समावेश आहे.
उपाशीपोटी हुलग्याचे पाणी घेतल्यास मेटाबॉलिझम वाढते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते व वजन नियंत्रणात राहते.
हुलग्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. ज्यामुळे पचन सुधारते आणि शरीर हलके वाटते.
हुलग्यातील अँटि-ऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारपणापासून संरक्षण मिळते.
हुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट स्वच्छ राहून पचनशक्तीही वाढते.
हुलग्यात कॅल्शियम, प्रथिने आणि लोह यांचे प्रमाण मुबलक असते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना बळकटी मिळते.
मधुमेह असणाऱ्यांसाठी हुलगे उपयुक्त आहेत. याच्या सेवनाने साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यासा मदत होते.ृ
हुलग्याचे पाणी प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. तसेच केस गळती कमी होऊन केस निरोगी राहतात.