Anuradha Vipat
फास्ट फूड संस्कृती आजच्या गतिमान जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
चवीला उत्तम आणि झटपट मिळणाऱ्या या पदार्थांमध्ये कॅलरीज, सोडियम , सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचे प्रमाण प्रचंड जास्त असते.
फायबर आणि आवश्यक पोषक घटकांची तीव्र कमतरता असते. या अस्वस्थ आहार पद्धतीमुळे समाजात जुनाट आजार झपाट्याने वाढत आहेत.
फास्ट फूडमध्ये हाय-कॅलरीज आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने वजन अनियंत्रितपणे वाढते.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यांसारख्या पदार्थांमध्ये सोडियम आणि ट्रान्स फॅट्स खूप जास्त असतात.यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल जमा होते आणि रक्तदाब वाढतो.
फास्ट फूडसोबत पिण्यात येणारे कोल्ड्रिंक्स किंवा पॅकबंद ज्यूस यामध्ये साखरेचे प्रमाण अवाजवी असते. या सवयीमुळे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो
कमी फायबर आणि जास्त तेलामुळे पचनक्रिया मंदावते. यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होऊन 'नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारखे जुनाट आजार उद्भवतात.