Anuradha Vipat
घरामध्ये सुख-समृद्धी आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
हे झाड वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशेला आणि नियमांचे पालन न करता लावले, तर त्याचा उलट परिणाम होऊन आर्थिक कोंडी होऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. ही दिशा बृहस्पतीची मानली जाते आणि मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे.
जमिनीला स्पर्श वेलीला दोरीच्या किंवा मॉस स्टिकच्या सहाय्याने नेहमी वरच्या दिशेने वाढवावे. वर जाणारी वेल घरातील सदस्यांची प्रगती दर्शवते.
झाडाची पाने पिवळी पडणे किंवा सुकणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. सुकलेले मनी प्लांट घरामध्ये गरिबी किंवा आजारपण आणू शकते.
वास्तू नुसार, मनी प्लांट हे पूर्णपणे 'इनडोअर प्लांट' आहे. या झाडावर बाहेरच्या लोकांची थेट वाईट नजर पडू नये, कारण यामुळे घरातील आर्थिक समृद्धीला बाधा पोहोचते.
असे मानले जाते की, स्वतःच्या घरातील मनी प्लांट दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि शुक्राचा प्रभाव दुसऱ्याच्या घरी चालला जातो.