Anuradha Vipat
कांद्याची पात चवीला जेवढी उत्तम असते तेवढीच ती आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानली जाते.
कांद्याच्या पातीत क्रोमियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
यात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए भरपूर असते. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
कांद्याच्या पातीत फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुधारते.
यात व्हिटॅमिन-के असते जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडांची घनता टिकवण्यासाठी आवश्यक असते
व्हिटॅमिन-ए मुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.
कांद्याच्या पातीमध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असतेजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.