Anuradha Vipat
दूध खराब झाल्यास ते फेकून देण्याची घाई करू नका. बरेच जण दूध खराब झालं म्हणून फेकून देतात.
खराब दुधापासून तुम्ही अनेक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता.
खराब झालेले दूध वापरून बनवता येणाऱ्या काही डिश खालीलप्रमाणे आहेत त्या आज आपण पाहूयात.
फाटलेले दूध पाणी आणि पनीरचे गोळे वेगळे झाल्यावर एका स्वच्छ सुती कापडाला बांधून त्यावर एखादे जड वस्तू ठेवून द्या. काही तासांत ताजे पनीर तयार होईल.
फाटलेले दूधात थोडे दूध पावडरआणि साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रणाचा गोळा तयार झाल्यावर एका ताटात तूप लावून त्यावर पसरा आणि थंड झाल्यावर काप करा.
गव्हाचे पीठ, रवा, मीठ, आणि तुमच्या आवडीच्या चिरलेल्या भाज्या फाटलेल्या दुधाच्या पाण्याने तव्यावर तेल लावून डोसे किंवा चिल्ले बनवा.
जर तुमची भाजी खूप पातळ झाली असेल, तर खराब झालेल्या दुधाचा वापर करून ती घट्ट करू शकता.