Anuradha Vipat
पालक ही केवळ एक भाजी नसून शरीराला निरोगी ठेवणारे एक उत्तम सुपरफूड आहे.
पालकामध्ये लोह , कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन्स (A, C, K) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते
पालकात कॅल्शियम आणि विटामिन 'के'मुळे हाडांची घनता वाढते. ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
यात 'ल्युटीन' आणि 'झेक्सॅन्थिन' ही अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक वाढत्या वयासोबत कमी होणारी डोळ्यांची दृष्टी सुधारतात.
पालकातील विटामिन 'सी' आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून वाचवतात आणि आजारी पडण्याची शक्यता कमी करतात.
पालकात असणारे 'नायट्रेट्स' रक्तवाहिन्या रुंद करतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयावरील ताण कमी होतो.