Anuradha Vipat
खमंग चिवडा हा दिवाळीच्या फराळातील एक महत्वाचा पदार्थ आहे. चिवड्याशिवाय दिवाळी फराळ अपुर्ण आहे.
आज आपण पाहूयात कुरकुरीत आणि खमंग चिवडा बनवण्याची सोपी पद्धत.
जाड पोहे , तेल , शेंगदाणे , सुक्या खोबऱ्याचे पातळ काप , डाळं, कढीपत्ता , हिरव्या मिरच्या , हिंग, हळद , लाल तिखट , मीठ , पिठीसाखर.
गरम तेलात पोहे घालून तळून घ्या. पोहे फुलून कुरकुरीत झाल्यावर एका टॉवेलवर ठेवा. तेलात शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या .
खोबऱ्याचे काप तळा आणि डाळं हलके परतून घ्या. कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले पोहे आणि इतर सर्व तळलेले साहित्य एकत्र करा.तेल गरम करुन त्यात हिंग आणि हळद तळून घ्या.
लाल तिखट, मीठ आणि पिठीसाखर आणि सर्व साहित्य पोह्यांवर व्यवस्थित एकत्र मिसळा असा आपला खमंग चिवडा तयार आहे.