Anuradha Vipat
सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु आहे. दिवाळी सण म्हटलं की फराळ हा आलाचं. आज आपण दिवाळी सणाच्या फराळासाठी ड्रायफ्रूट बर्फी कशी बनवायची हे पाहूयात.
काजू - १/२ कप, बदाम - १/२ कप, पिस्ता - १/४ कप, अक्रोड - १/४ कप, खजूर - १.५ कप, अंजीर - ८ ते १० , खसखस - २ चमचे, वेलची पूड - १ चमचा, तूप - २ चमचे.
काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.
भाजलेले ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून खसखस घालून भाजून घ्या. खजूर आणि भिजवलेले अंजीर एकत्र करून पेस्ट करून घ्या.
तूप गरम करून खजूर-अंजीरची पेस्ट घट्ट होईपर्यंत परता. भाजलेले ड्रायफ्रूट्स, खसखस आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.
मिश्रण ताटात काढून घ्या. मिश्रण गरम असतानाच हाताने एकसारखे थापून घ्या.
बर्फी थंड झाल्यावर चाकूने चौकोनी आकारात कापून घ्या. स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रायफ्रूट बर्फी तयार आहे.