Anuradha Vipat
दिवाळीच्या फराळासोबत नाश्त्याला काहीतरी झणझणीत खायची इच्छा होतेचं . यासाठीचं आज आम्ही तुमच्यासाठी खास झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत.
झणझणीत शेंगदाण्याची चटणी तुम्ही इडली, डोसा, वडा, थालीपीठ किंवा गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता.
१ वाटी भाजलेले शेंगदाणे , ४-५ लाल सुक्या मिरच्या , ४-५ लसणाच्या पाकळ्या, १ चमचा जिरे, मीठ ,१ चमचा तेल .
थोडे तेल घालून त्यात जिरे, लसूण आणि लाल सुक्या मिरच्या परतून घ्या.
भाजलेले शेंगदाणे घालून सर्व मिश्रण चांगले परता. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात त्यात चवीनुसार मीठ घालून जाडसर वाटून घ्या.
गरम गरम भाकरी किंवा थालीपीठासोबत ही चटणी खाण्यासाठी तयार आहे.