Anuradha Vipat
झणझणीत चिकन रान खायला सर्वांनाचं आवडतं.चला तर मग आज पाहूयात झणझणीत चिकन रान बनवण्यासाठीची रेसिपी.
झणझणीत चिकन रान बनवण्यासाठी चिकनचे मोठे तुकडे दह्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, लिंबू रस आणि मीठ घालून मॅरीनेट करा.
चिकन शिजवून, भाजून घ्या आणि त्यावर तंदुरीसारखी चव येण्यासाठी कोळशावर शिजवा.
एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, खोबरे परतून घ्या. त्यात धणे, जिरे, गरम मसाला घालून वाटण तयार करा.
शिजवलेले वाटण मॅरीनेट केलेल्या चिकनमध्ये मिक्स करा.
चिकन रस्सा बनवायचा असेल तर वाटणात पाणी घालून ग्रेव्ही तयार करा
जर तुम्हाला 'चिकन रान' पूर्णपणे शिजवायचे असेल तर चिकनचे तुकडे वाफेवर शिजवा.