Anuradha Vipat
एखादी व्यक्ती कशी बोलते, कोणत्या स्वरात बोलते आणि कोणते शब्द वापरते यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव सहज ओळखता येते.
जे लोक खूप वेगाने बोलतात ते सहसा उत्साही, अधीर किंवा चिंताग्रस्त असू शकतात.
असे लोक शांत, विचारपूर्वक बोलणारे आणि गंभीर स्वभावाचे असतात.
मोठा आणि कठोर आवाज असलेले लोक सहसा आत्मविश्वासू, वर्चस्व गाजवणारे किंवा आक्रमक स्वभावाचे असू शकतात.
मऊ आणि शांत आवाजातील व्यक्ती प्रेमळ, नम्र, संवेदनशील आणि इतरांची काळजी घेणाऱ्या असतात.
जे लोक बोलताना नेहमी सकारात्मक शब्द वापरतात ते आशावादी आणि आनंदी स्वभावाचे असतात.
सतत तक्रार करणारे किंवा नकारात्मक शब्द वापरणारे लोक निराशावादी किंवा सतत टीका करणारे असू शकतात.