Anuradha Vipat
वजन कमी करताना 'काय खावे' यासोबतच 'काय खाऊ नये' हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वजन कमी करताना केवळ व्यायाम करून फायदा होत नाही तर आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
वजन कमी करताना साखर, साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ, मिठाई, चॉकलेट्स आणि कँडीज पूर्णपणे टाळा.
वजन कमी करताना सोडा, कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड फ्रूट ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळा.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे पदार्थ टाळा कारण त्यात चरबी खूप जास्त असते.
समोसे, कचोरी, भजी, पुरी यांसारखे तेलात तळलेले पदार्थ टाळा.
पांढरा ब्रेड, पाव, नान, आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळा.