Mahesh Gaikwad
देशभरात होळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा २५ मार्चला देशभर होळी साजरी केली जाणार आहे.
होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून ओळखला जातो. देशात उत्तरेतील भागात मोठ्या प्रमाणात होळीच्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.
होळी साजरी करताना बहुतांश लोक भांग पितात. अशावेळी गरजेपेक्षा जास्त भांग पिल्यामुळे जबरदस्त नशा होते. अशावेळी तुम्ही घरगुती टिप्स वापरून भांगेची नशा उतरवू शकता.
भांगेची नशा उतरविण्यासाठी नशा झालेल्या व्यक्तिला आंबट पदार्थ खायला द्या.
जास्त नशा झालेल्या व्यक्तीला आल्याचा तुकडा चोखण्यासाठी द्यावा. त्याने नशा उतरण्यास मदत मिळते.
अनेकदा भांगेची नशा जास्त प्रमाणत झाल्याने लोक बेशुध्दही होतात. साखर, मीठ न घालता एक ग्लासभर पाण्यात दोन लिंबांचा रस पिळून प्यायला द्यावा.
चिंच गुळाच्या पाण्याचा पाण्याचे मिश्रण करून पाजल्यानेही भांगेची नशा उतरण्यास मदत होते.