Goat Breed : बकरी ईदसाठी 'या' वजनदार जातींच्या बोकडांना विशेष डिमांड

Mahesh Gaikwad

बकरी ईद

रमजान ईदप्रमाणेच इस्लाम धर्मामध्ये ईद-ऊल-अदाह म्हणजेच बकरी ईद या सणाचेही मोठे महत्त्व आहे.

Goat Breed | Agrowon

रमजान ईद

मुस्लिम धर्मियांमध्ये बकरी ईद हा सण त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. रमजाननंतर मुस्लिम धर्मियांमध्ये साजरा होणारा बकरी ईद हा दुसरा मोठा सण आहे.

Goat Breed | Agrowon

बोकडांची कुर्बानी

बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बोकडांची कुर्बानी देतात. कुर्बानीसाठी विशेष गुणधर्म असलेल्या बोकडांना मोठी मागणी असते.

Goat Breed | Agrowon

वजनदार बोकड

सामान्यत: बकरी ईदसाठी वजनदार बोकडांना मोठी मागणी असते. खरेदीदार जास्त वजनाच्या बोकडांच्या शोधात असतात.

Goat Breed | Agrowon

बोकडांच्या जाती

३५-४० किलो वजनाचे बोकड साधारणपणे सर्वच जातींमध्ये सहज मिळतात. मात्र, ५०-६० किलो वजनाच्या काहीच खास जाती आहेत.

Goat Breed | Agrowon

गोहिलवाडी बोकड

गोहिलवाडी जातीचे बोकड गुजरातच्या राजकोट, जूनागड, पोरबंदर, अमरेली आणि भावनगरमध्ये आढळतात.

Goat Breed | Agrowon

बोकडांना मागणी

देशभरात या जातीची संख्या खूप कमी आहे. यामुळे या जातीच्या शेळी-बोकड मिळणे खूप कठीण असते.

Goat Breed | Agrowon

बोकडाचे वजन

गोहिलवाडी जातीच्या बोकडाचे वजन साधारणपणे ५०-५५ आणि शेळी ४०-४५ किलोपर्यंत असते.

Goat Breed | Agrowon

जखराना बोकड

याशिवाय राजस्थानच्या अलवरमध्ये जखराना जात आढळते. या जातीच्या बोकडाचे वजन ५५ ते ५८ किलो इतके असते.

Goat Breed | Agrowon

बरबरी बोकड

तर बरबरी जातीच्या बोकडाचे वजन ३० ते ३५ किलोपर्यंत असते. उत्तर प्रदेशमध्ये बकरी ईदनिमित्त या जातीच्या बोकडांची मोठ्या प्रमाणत विक्री होते.

Goat Breed | Agrowon