Mahesh Gaikwad
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे ओढा पाहायला मिळतो.
दिवसेंदिवस दुधाची वाढती मागणी पाहता पशुपालक दुग्ध व्यवसायासाठी संकरित पशुधनाचे संगोपन करतााना सर्रास दिसतात.
गोठ्यातील देशी गोवंशाची जागा संकरित पशुधनाने घेतल्यामुळे देशी पशुधनाच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशाच देशी गायी आणि म्हशींची माहिती आपण पाहणार आहोत.
या गायीचे मूळस्थान प्रामुख्याने गुजरात राज्यात आढळते. लांब कान, मजबूत बांधा, रंगाने लाल अशी या गायीची शारिरिक रचना असते. ही गाय दिवसाला २० लिटरपर्यंत दूध देते.
पंजाब आणि राजस्थान या जिल्ह्यात या गायीचे मूळ आढळते. या गायीची शिंगे टोकदार असतात. तसेच रंगाने लाल असून तिच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते. ही गाय दिवसाला १३ लिटरपर्यंत दूध देते.
ही गाय राजस्थानमधील कच्छ आणि राजस्थानच्या बाडमेर, जैसलमेर आणि जोधपूर जिल्ह्यात आढळते. पांढऱ्या रंगाची ही गाय दिवसाला सरासरी ८-९ लिटरपर्यंत दूध देते.
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू आणि नागपूरच्या नरखेड आणि काटोल तालुक्यात या गायीचे संगोपन केले जाते. रंगाला पांढरी असलेली ही गाय दिवसाला ३ लिटरपर्यंत दूध देते.
ही म्हैस महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातार आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळतात. ही म्हैस दिवसाला सरासरी २० लिटरपर्यंत दूध देते.
महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ही म्हैस आढळते. मध्यम बांध्याची ही म्हैस प्रतिदिन १० लिटरपर्यंत दूध देते.
हरियाणा राज्यात मूळ असलेली ही म्हैस सर्वाधिक पशुपालकांकडे पाहायला मिळते. ही म्हैस दिवसाला २० लिटरपर्यंत दूध देते.