Team Agrowon
सोयाबीनचे वायदे मागील सव्वा महिन्यातील निचांकी पातळीवर पोचले आहेत.
आज सोयाबीनचे वायदे १३.११ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.
देशातील बाजारातही नरमाई कायम असून सोयाबीनला आज बाजारात सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला.
ब्राझीलमधील बदलत्या परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील सोयाबीनचा बाजार बदलत आहे.
सोयाबीनच्या दरातील चढ उतार आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज आहे.
तर सोयापेंडचे वायदेही दीड महिन्यातील निचांकी पातळीवर येऊन आज ४१० डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले होते.