Herbicide For Soybean: तणमुक्त सोयाबीनसाठी पेरणीनंतर ४८ तासांत करा ही फवारणी!

Swarali Pawar

सोयाबीनमध्ये तणांचा त्रास वाढतोय?

सोयाबीनमध्ये सुरुवातीला तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. वेळेत तणनियंत्रण केल्यास पिकाची वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारते.

Soybean Herbicide Control | Agrowon

पहिले ३० दिवस का महत्त्वाचे?

पेरणीनंतरचे पहिले ३० दिवस पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. याच काळात तण पाणी, अन्नद्रव्ये आणि जागेसाठी पिकाशी स्पर्धा करतात.

Soybean Herbicide Control | Agrowon

उगवणपूर्व तणनाशक कधी फवाराल?

पेरणीनंतर जास्तीत जास्त ४८ तासांच्या आत फवारणी करा. यामुळे तण उगवण्यापूर्वीच त्यांचे नियंत्रण होते.

Soybean Herbicide Control | Agrowon

कोणते तणनाशक वापरावे?

सल्फेनट्राझोन २८% + क्लोमाझोन ३०% डब्ल्यू.पी. हे संयुक्त तणनाशक वापरा. हे सोयाबीनमधील सुरुवातीच्या तणनियंत्रणासाठी प्रभावी ठरते.

Soybean Herbicide Control | Agrowon

फवारणीचे प्रमाण किती?

प्रति लिटर पाण्यात २.५ ग्रॅम तणनाशक मिसळा. किंवा एकरी ५०० ग्रॅम तणनाशक २०० लिटर पाण्यातून फवारा.

Soybean Herbicide Control | Agrowon

उगवणपूर्व फवारणीचे फायदे

तणांची सुरुवातीपासूनच वाढ कमी होते. पिकाला पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश अधिक मिळतो.

Soybean Herbicide Control | Agrowon

मजुरी आणि खर्चात बचत

वेळेवर खुरपणी करण्याची गरज कमी पडते. यामुळे मजुरीचा खर्च आणि श्रम दोन्ही वाचतात.

Soybean Herbicide Control | Agrowon

तणमुक्त पीक, चांगले उत्पादन

सुरुवातीपासून तणांचे नियंत्रण झाल्यास पीक जोमाने वाढते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

Soybean Herbicide Control | Agrowon

Rainwater Harvesting In Farms: कमी पावसातही पिकांना मिळेल ओलावा! मृत आणि बंदिस्त सरींचा करा वापर

Agrowon
अधिक माहितीसाठी...