Team Agrowon
यंदा कमी पावसाची शक्यता असल्याने पडणारे पाणी शेतातच मुरवणे गरजेचे आहे. मृत सरी, बंदिस्त सरी आणि उभ्या पिकातील सऱ्या यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
पेरणीपूर्वी जमिनीच्या उताराला आडव्या सऱ्या काढल्या जातात. यामध्ये पावसाचे पाणी साठून हळूहळू जमिनीत मुरते.
पाणी वाहून न जाता शेतातच जिरते आणि ओलावा जास्त काळ टिकतो. यामुळे पिकांना पावसाच्या खंडातही आधार मिळतो.
पेरणीनंतर सऱ्या काढून ठराविक अंतरावर आडवे वरंबे तयार केले जातात. यामुळे पाणी पुढे वाहून न जाता सऱ्यांमध्येच थांबते.
कापूस, तूर आणि ज्वारीसारख्या पिकांसाठी ही पद्धत फायदेशीर आहे. या पद्धतीने अधिक पावसाचे पाणी जमिनीत मुरवता येते.
पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागत झाल्यावर सरी काढा. यामुळे शेतातील पाणी साचून जमिनीत मुरते.
कापूस आणि तुरीत २ ओळीनंतर सरी काढा. सोयाबीन, ज्वारी आणि बाजरीत ४ ते ६ ओळीनंतर सरी पाडा.
सरी काढताना नांगर खूप खोल जाऊ देऊ नका. यामुळे पिकांवर माती पडणार नाही आणि पिकांची वाढही चांगली राहील.