Swarali Pawar
जास्त पावसानंतर सोयाबीनमध्ये मुळकुज आणि खोडकुज रोगाचा धोका वाढतो. वेळीच लक्षणे ओळखून उपाय केल्यास मोठे नुकसान टाळता येते.
पाने खाली झुकतात, मलूल पडतात आणि नंतर पिवळी होऊ लागतात. अशी लक्षणे दिसताच पिकाची त्वरित तपासणी करा.
रोगग्रस्त झाड उपटल्यावर मुळांची साल सहज निघते. मुळे पांढरट दिसतात आणि पुढे संपूर्ण झाड वाळून जाते.
मुळाजवळ आणि बुंध्याभोवती पांढरी बुरशी दिसते. मोहरीच्या दाण्यासारखे कण तयार होऊन झाड सडू लागते.
मुळकुज आणि खोडकुज नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्रभावी ठरतो. ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बुंध्याजवळ आळवणी करा.
ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळूनही जमिनीत देता येतो. यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
प्रादुर्भाव तीव्र असल्यास कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी वापरा. १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बुंध्याजवळ आळवणी करा.
एकाच शेतात दरवर्षी सोयाबीन घेणे टाळा. पिकांची फेरपालट केल्यास मुळकुज आणि खोडकुजचा धोका कमी होतो.