Swarali Pawar
पावसाळ्यात गोठ्यात ओलसरपणा वाढल्यामुळे डास आणि गोमाशींचा प्रादुर्भाव वाढतो. वेळीच नियंत्रण केल्यास जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवता येते.
ओला चारा, शेण, गोमूत्र आणि साचलेले पाणी हे त्यांचे आवडते ठिकाण असते. याच ठिकाणी ते अंडी घालून झपाट्याने वाढतात.
डास चावल्यामुळे खाज, सूज, लालसरपणा आणि जखमा होऊ शकतात. जनावरे अस्वस्थ राहून खाणे-पिणेही कमी करतात.
डासांचा सतत त्रास झाल्यास जनावरांना ताण येतो. यामुळे दूध उत्पादनात १० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
डास आणि गोमाशांमुळे लम्पी, लाळ्या-खुरकुत आणि इतर आजारांचा धोका वाढतो. ताप, अशक्तपणा आणि अंगावर फोड अशी लक्षणे दिसू शकतात.
शेण, उरलेला चारा आणि साचलेले पाणी त्वरित काढून टाका. गोठ्यात हवा खेळती राहील याचीही काळजी घ्या.
गोठ्यात स्टिकी ट्रॅप लावा आणि संध्याकाळी कडूनिंब, गवती चहा किंवा लवंगाचा धूर करा. गरजेनुसार जैविक कीडनाशकांची फवारणीही करा.
जनावरांच्या अंगावर कडूनिंब तेल किंवा मच्छरप्रतिबंधक औषध लावा. गोठ्यात मच्छरदाणी वापरा आणि आजूबाजूला तुळस व गवती चहाची लागवड करा.