Soybean Karpa Disease: सोयाबीनवर करप्याचा प्रादुर्भाव, तातडीने करा उपाय

Swarali Pawar

प्रादुर्भावाची कारणे

जास्त तापमान, साचलेलं पाणी आणि आर्द्रता करपा रोगासाठी पोषक ठरतात. योग्य वेळी उपाय न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

Reasons of Disease | Agrowon

रोगाचे मुख्य कारण

करपा हा बुरशीजन्य रोग असून कोलेक्टोट्रीकम डिमॅटियम या बुरशीमुळे होतो. बियाण्यांद्वारे आणि झाडांच्या अवशेषांद्वारे याचा प्रसार होतो.

Cause of Disease | Agrowon

उत्पादनावर नुकसान

करपा रोगामुळे १६ ते २५% उत्पादन घटते. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास १००% पिके नष्ट होऊ शकतात.

Soybean Crop Damage | Agrowon

सुरुवातीची लक्षणे

खोड, पाने व शेंगांवर लालसर, गडद तपकिरी डाग दिसतात. त्यावर नंतर बुरशीचे काळसर आवरण तयार होते.

Symptoms of Anthracnose | Agrowon

शेंगा व दाण्यांवर परिणाम

रोगग्रस्त शेंगा सुरुवातीला पिवळट-हिरवट होतात, नंतर वाळतात. दाणे लहान, सुरकुतलेले राहतात किंवा तयारच होत नाहीत.

symptoms of disease | Agrowon

तीव्रता वाढल्यावर

रोगामुळे पाने पिवळी-तपकिरी होऊन गळतात. प्रादुर्भावग्रस्त बियाण्यांपासून पेरलेली पिके लगेच मरतात.

Symptoms of Disease | Agrowon

नियंत्रणाची पद्धत

पेरणीसाठी स्वच्छ बियाणे वापरा, प्रतिकारक्षम वाण निवडा, रोगग्रस्त अवशेष काढून टाका आणि बियाणांना थायरम किंवा कॅप्टनने प्रक्रिया करा.

Karpa disease in Soybean | Agrowon

फवारणीसाठी शिफारस

करपा नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल + सल्फर (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) किंवा टेब्युकोनॅझोल २५.९% ईसी (१२.५ मि.ली./१० लिटर पाणी) फवारणी करा.

Soybean Crop | Agrowon

Mosambi Pest Control: सिट्रस सायला किडीचा हल्ला! ग्रिनींग रोगापासून मोसंबी वाचवण्यासाठी तातडीचे उपाय..

अधिक माहितीसाठी...