Swarali Pawar
ग्रीनिंग हा जिवाणूमुळे होणारा रोग आहे. सिट्रस सायला नावाची कीड हा रोग झाडातून झाडात पसरवते.
पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो, फळं लहान राहतात, रस कडवट होतो आणि झाडं हळूहळू सुकायला लागतात.
संसर्गग्रस्त कलमं, रोगग्रस्त मातृवृक्ष आणि सिट्रस सायला किडीमुळे रोग झपाट्याने पसरतो.
ही कीड कोवळ्या पानांवर रसशोषण करतेे. या किडीमुळे पाने आणि कळ्या गळतात. पांढरट पावडर दिसली की प्रादुर्भाव झाला असे समजावे.
रोगमुक्त कलम वापरा, संसर्गग्रस्त फांद्या कापून नष्ट करा आणि अवजारे निर्जंतुक ठेवा.
पिवळे चिकट सापळे ३० ते ४० प्रति एकर लावावेत. हे फेब्रुवारी ते नोव्हेंबरदरम्यान प्रभावीपणे कीड नियंत्रण करतात.
क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरॅक्सिया रॅडीयाटा यांसारखे मित्र कीटक सायला किड नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.
थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.