Summer Mung : या उन्हाळ्यात पेरा कमी दिवसात, कमी पाण्यात येणारे उन्हाळी मूग

Team Agrowon

कमी पाण्यात, कमी दिवसांत येणारे मूग

मूग हे कमी पाण्यात, कमी दिवसांत आणि कमी खर्चात येणारे कडधान्यवर्गीय पीक आहे.

Summer Mung | Agrowon

जमीन

लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीत लागवड करू नये.

Summer Mung | Agrowon

जमीन तयार करणे

लागवडीपूर्वी जमिनीची हलकी नांगरट करून कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर हेक्टरी ६ ते ८ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

Summer Mung | Agrowon

पेरणीची वेळ

पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिल्या पंधरवडा या दरम्यान करावी.

Summer Mung | Agrowon

अंतर

दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंमी तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

Summer Mung | Agrowon

बियाणे

पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.

Summer Mung | Agrowon

सुधारित वाण

पुसा वैशाखी, वैभव, पी.के.व्ही ग्रीन गोल्ड, कोपरगाव, एस-८, फुले एम-२. हे वाण ६५ ते ७० दिवसात तयार होतात.

Summer Mung | Agrowon
आणखी पाहा...