Team Agrowon
जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये ही हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. पण हाच हिरवा चारा जनावरांना नियमीत मिळत नाही.
जनावरांना नियमीत हिरवा चारा मिळत राहावा यासाठी जर शेतातील काही भागावर जर तुम्ही हिरव्या चाऱ्याची लागवड केली तर जनावरांसाठी घरच्याघरी हिरवा चारा मिळत राहतो.
चारा पिकापैकी ओट हे भरपूर फुटवे असणार एकदलवर्गीय चारा पीक आहे.
ओट हे काहीसं गहू पिकासारख दिसणारं, पण गव्हापेक्षा थोडं उंच वाढणारं चारा पीक आहे.
ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असतो.
खोड रसाळ, लुसलुशीत असत. चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असत.
दुभत्या जनावरांना ओट चा चारा दिल्यास दुधाच उत्पादन वाढत याशिवाय दुधातील फॅटच प्रमाणही वाढत.
ओट चारा पीक एकदा लावल की त्यापासून कापणी करुन चारा मिळत राहतो.