Anuradha Vipat
साऊथ इंडियन स्त्रियांच्या लांब, काळ्या आणि दाट केसांचे रहस्य हे त्यांच्या पारंपारिक आणि नैसर्गिक पद्धतींमध्ये दडलेले आहे.
दक्षिण भारतात शुद्ध खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.
दक्षिण भारतात अनेक घरांमध्ये खोबरेल तेलात कढीपत्ता, जास्वंदाची फुले, आवळा आणि मेथीचे दाणे उकळून 'होममेड हेअर ऑइल' तयार केले जाते.
कढीपत्त्यातील पोषक घटक केसांचे मुळांपासून पोषण करतात तर जास्वंदाची फुले आणि पाने नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात .
शिकाकाई, रिठा आणि आवळा यांच्या मिश्रणाने केस धुतले जातात. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहते.
आठवड्यातून किमान दोनदा कोमट तेलाने टाळूचा मसाज केल्याने केसांची वाढ वेगवान होते.
केस धुण्यासाठी 'फर्मेन्टेड' तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने केसांना चमक येते आणि ते मजबूत होतात