Anuradha Vipat
वयाच्या चाळीशीनंतर शरीराची चयापचय शक्ती मंदावते आणि हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात.
वयाच्या चाळीशीनंतरचा आहार कसा असावा यासाठी पाहूयात काही खास टिप्स.
चाळीशीनंतर स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते. हे रोखण्यासाठी आहारात डाळी, कडधान्ये, अंडी, पनीर आणि सोयाबीन यांचा समावेश करा.
दूध, दही, ताक, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा. सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने व्हिटॅमिन-D नैसर्गिकरित्या मिळते.
पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचे आहे.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या.
रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा.