Bhopala healthy: भोपाळा आरोग्यासाठी हितकारक आहे का?

Team Agrowon

पचनसंस्थेतील आम्लता, अल्सर, अपचन, वेदना, घशाला पडणारा अतिशोष यावर ते उपयोगी ठरते. भोपळ्याचा आहारातील वापरामुळे पचन चांगले होते, शरीराचे वजन नियंत्रणात राहते, हृदयाचे स्नायू बळकट होतात.

ते बद्धकोष्ठता, रक्तातील साखरेची पातळी आणि किडनी व यकृतातील दाह, मूत्रमार्गातील प्रादुर्भाव कमी करते.

भीती, मानसिक विकार, तीव्र जुलाब, खोकला, दमा, श्वसनमार्गाचे विकार, निद्रेसंबंधी समस्या यावरील उपचारामध्ये भोपळ्याचा फायदा होतो.

भोपळ्याची भुकटी ही मानसिक आजारावर, अपस्मारावरील उपचारासाठी उपयोगी ठरतात.

भोपळ्याचा रस आम्लपित्त, अपचन आणि अल्सर यांच्या उपचारासाठी वापरला जातो. त्याचा फायदा वेदना, ताप, दीर्घ खोकला, दमा आणि श्वसनाच्या विकारांमध्ये होतो.

भोपळ्याच्या रस बद्धकोष्ठता, अकाली केस पांढरे होणे, मूत्रमार्गाचे विकार आणि अनिद्रेच्या विकारासाठी उपयुक्त ठरते.

क्लिक करा