Sonchafa Cultivation : सोन्यासारख्या सोनचाफ्याची लागवड कशी करायची?

Team Agrowon

सोनचाफा दुर्लक्षीत

गुलाब, जरबेरा, कार्नेशियन, शेवंती, मोगरा, जाई-जुई, लिली यांसारख्या फुलांना फुलांच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून, आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित व फुलशेतीमध्ये विशेष लागवड नसलेले सोनचाफ्याचे झाड.

Sonchafa Cultivation | Agrowon

कलमांची निवड

सोनचाफा कलमांची लागवड केली असता अशा झाडांपासून लवकर व झाडांची कमी उंची ठेवून फुलांचे उत्पादन घेता येते.

Sonchafa Cultivation | Agrowon

जमीन

सोनचाफा लागवड करताना पाण्याचा निचरा उत्तमप्रकारे होणारी जमीन हवी. तसेच सूर्यप्रकाश, भरपूर हवा, इतर झाडांची सावली असल्यास सूर्यप्रकाशाकरिता ही झाडे उंच वाढतात.

Sonchafa Cultivation | Agrowon

लागवडीचा काळ

पाण्याची बारमाही सोय असल्यास कोणत्याही हंगामामध्ये लागवड करता येते. कलम लावताना खड्डा 60 सेंमी × 60 सेंमी. उंची 60 ते 75 सेंमी, असा खणून त्यामध्ये कुजलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखताने अर्धा भरावा.

Sonchafa Cultivation | Agrowon

लागवड

दोन झाडांमधील अंतर 3 मीटर व दोन ओळींमधील अंतर 3 मीटर ठेवावे. 3×3 मीटर याप्रमाणे लागवड केली असता एका आरला 10 झाडे बसतात. एकरी 400 व हेक्‍टरी 1000 झाडे लागतात.

Sonchafa Cultivation | Agrowon

फुले येण्याचा काळ

एक वर्षानंतर या कलमांना कळ्या येऊन फुले येऊ लागतात. सुरवातीस हे प्रमाण कमी जास्त असते. दोन वर्षांनंतर झाडांची वाढ जोमदार झाल्यावर प्रत्येक झाडाला सरासरी 15 ते 20 फुले येतातच. फुले येण्याचा कमी जास्त काळ वगळता वर्षातून 180 दिवस फुले मिळतात.

Sonchafa Cultivation | Agrowon

फुलांची काढणी

सकाळी लवकर फुले काढून ती जवळच्या बाजारामध्ये पाठवावी. उन्हाने व धक्‍क्‍याने हे नाजूक फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री या गोष्टी त्वरेने होणे महत्त्वाचे आहे.

Sonchafa Cultivation | Agrowon