Aslam Abdul Shanedivan
आपला देश खास मसाल्यांसाठी ओळखला जातो. येथे विविध प्रकारचे मसाले मिळतात. तर यातील प्रत्येक मसाल्याची चव वेगवेगळी आहे
आपल्या घरातील मसाले जेवणातील स्वाद वाढवण्यासह आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतात.
आपल्या आरोग्यासाठी दालचिनी फार फायदेशीर असून दालचिनीमुळे आपले पोट साफ होण्यास मदत होते.
ॲसिडिटी आणि आंबट ढेकर सारख्या समस्यांवर हिंग उपयुक्त असून ते एक ग्लास गरम पाण्यातून हिंग घेता येते.
अपचन आणि सतत पोट दुखणे या समस्येवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही ओवा वापरता येतो
आलं हे जेवणाची चव वाढणारा गटक असून यामुळे अन्न पचवण्याची ताकद वाढते
पोट साफ होण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे काम जिरे करते. तर जिरे असलेले पाणी पिल्याने पोट पटकन साफ होते.