Mahesh Gaikwad
स्मरणशक्ती तल्लख होण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामाचे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण केवळ बदामच नाही तर त्याच्या तेलाचेही खूप फायदे आहेत. बदामाचे तेल त्वचेसाठी खूपच गुणकारी आहे. बदाम तेलाचे त्वेचेसाठी काय फायदे आहेत याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटामिन-सी, व्हिटामिन-ए, व्हिटामिन-डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, जस्त, लोह, मॅंगनिज, फॉस्फरस आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यासारखे घटक असतात.
बदामाचे तेल तुम्ही दोन प्रकारे लावू शकता. तुम्ही बदामाचे तेल लोशन किंवा मॉइश्चुरायझरमध्ये मिसळून लावू शकता. याशिवाय तुम्ही कशातही न मिसळता थेट लावू शकता.
चेहऱ्यावर दररोज झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश केल्यास त्वचेच्या अनेक समस्या आणि डाग दूर होतात.
जर तुमच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतील, तर रोज त्याठिकाणी बदामाच्या तेलाने मालिश करावी. यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स निघून जातील.
बदामाचे तेल हे नैसर्गिक मॉइश्चुरायझरचे आहे, जे त्वेचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे डोळ्याच्या खालील काळी वर्तुळेही कमी होतात.
याशिवाय बदामाचे तेल अँटी-एजिंगचे काम करते. याच्या वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे तुमची त्वचा तरूण दिसते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.