Agri App : शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करणारे हे ॲप्स ठरतील उपयुक्त

Swapnil Shinde

ट्रॅक्टर जंक्शन ॲप

ट्रॅक्टर जंक्शन हे ॲप नवनवीन ट्रॅक्टर मॉडेल्स, अवजारे आणि विविध ब्रँड्सच्या अॅक्सेसरीजची माहिती मिळवण्यासाठी उपयोग ठरते.

Tractor Junction App | Agrowon

क्रिश-ई (Krish-e) ॲप

क्रिश-ई हे ॲप शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक पीक दिनदर्शिका तयार करून देते. त्याच्या माध्यमातून हवामान, पिकांची लागवड आणि काढणीसंबंधी माहिती देते.

Krish-e App | Agrowon

खेती बडी ॲप

सेंद्रिय शेतीबद्दल जागृकता वाढल्याने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशी संबंधित माहितीसाठी खेती बडी या अॅपचा उपयोग होतो.

Kheti Buddy App | Agrowon

क्राॅप इन्शुरन्स ॲप

या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात सर्व अडीअडचणी आणि अपडेटची माहिती मिळते.

Crop Insurance App | Agrowon

अ‍ॅग्री ॲप

या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक उत्पादन, व्यवस्थापन आणि संरक्षणांबाबत पद्धतींची माहिती देते.

Agri App | Agrowon

कृषीफाय ॲप

या अॅपच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग जसे की, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन, मत्स्यपालन इत्यादी बाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो.

Krishify App | Agrowon

पुसा कृषी ॲप

या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन संस्था (IRAI) द्वारे विकसित केलेल्या नवनवीन तंत्रज्ञान, नवीन पीक आणि त्यांच्या लागवडीबाबत माहिती मिळते.

Pusa Krishi App | Agrowon

किसान सुविधा ॲप

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि सेवांची माहिती या अॅपमध्ये मिळतात.

Kisan Suvidha App | Agrowon