Gauri Pujan Naivedya : समृद्धी आणि बरकतीसाठी गौराईला अर्पण करा 'हा' खास महाप्रसाद!

Anuradha Vipat

सण

ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रभरात अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.

Gauri Pujan Naivedya | agrowon

अन्न आणि धनाची कमतरता

असे मानले जाते की, या दिवशी देवी महालक्ष्मीला तिचे आवडते पारंपारिक नैवेद्य अर्पण केल्यास घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही.

Gauri Pujan Naivedya | agrowon

१६ प्रकारच्या पालेभाज्या

गौरी पूजनाच्या दिवशी १६ प्रकारच्या पालेभाज्या किंवा मिश्र भाज्या एकत्र करून बनवलेल्या भाजीचा नैवेद्य दाखवण्याची मुख्य परंपरा आहे.

Gauri Pujan Naivedya | agrowon

महत्त्वाच्या भाज्या

यामध्ये प्रामुख्याने अळू, मेथी, पालक, अंबाडी, शेपू, चवळी, लाल माठ, गवार, भेंडी, कारले, वांगी, पडवळ, आणि विविध प्रकारच्या मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश केला जातो.

Gauri Pujan Naivedya | agrowon

वैशिष्ट्य

हा स्वयंपाक पूर्णपणे कांदा आणि लसूण न वापरता शुद्ध सात्त्विक पद्धतीने केला जातो. ही भाजी समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक मानली जाते.

Gauri Pujan Naivedya | Agrowon

पुरणपोळी आणि कटाची आमटी

महाराष्ट्रीयन परंपरेत पुरणपोळीशिवाय महालक्ष्मीचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो. पुरणपोळी, सोबत खमंग कटाची आमटी, भात, आणि साजूक तुपाची धार नैवेद्याच्या पानात वाढली जाते.

Gauri Pujan Naivedya | agrowon

Vastu Tips For Gauri : गौरीचे मुखवटे खरेदी करताना 'या'चुका टाळा; अन्यथा घरात येईल नकारात्मकता!

Vastu Tips For Gauri | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...