Mahesh Gaikwad
हिंदू पंचांगानुसार ८ एप्रिल रोजी सुर्याला ग्रहण लागणार आहे. २०२४ वर्षात होणारे हे पहिलेच सुर्यग्रहण आहे.
सुर्यग्रहण ही एक खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी घटना आहे. मात्र, धार्मिकदृष्टीने सुर्य किंवा चंद्राला ग्रहण लागणे अशुभ मानले जाते.
ग्रहणाच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. ग्रहण काळात याचा आसपासच्या सर्व गोष्टींवर प्रभाव पडतो, अशी मान्यता आहे.
आज होणारे सुर्यग्रहण खास असून तब्बल ५४ वर्षांनी सुर्याला ग्रहण लागणार आहे. ८ एप्रिलला रात्री ९ वाजून १२ मिनीटांनी लागणार असून ९ एप्रिल रात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
गेल्या ५४ वर्षातील सर्वात मोठे सुर्यग्रहण असणार आहे. परंतु भारतीयांना हे सुर्यग्रहण अनुभवता येणार नाही.
सुर्यग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे.
कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बर्म्युडा, कोलंबिया, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, रशिया स्पेन या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे.