Mahesh Gaikwad
'संडे हो या मंडे रोज खा अंडे' असं आपण म्हणतो. कारण रोज अंडे खाणे शरीरासाठी चांगला आहार मानला जातो.
अंडी हे असे फूड प्रॉडक्ट आहे, जे बाराही महिने उपलब्ध असते. शरीराला ताकद मिळावी यासाठी अनेकांच्या ब्रेकफास्टमध्ये अंडे ही मुख्य मेन्यू असतो.
परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवसांत अंडी लवकर खराब होतात. या दिवसांत अंड्याची टिकवण क्षमता कशी वाढवायची याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.
काही घरगुती ट्रीक वापरून तुम्ही अंड्यांना जास्त काळासाठी फ्रेश ठेवू शकता.
सामान्यत: घरात आपण फ्रीजमध्ये अंडी ठेवतो. अंडी ठेवताना ती मधल्या रॅकवर ठेवा. येथील तापमान एकसारखे असते.
जर तुम्ही अंडी फ्रीजच्या दरवाजाच्या भागात ठेवत असाल, तर ती लवकर खराब होण्याची शक्यता असते.
घरात जर फ्रीज नसेल तर तुम्ही अंडी तागाच्या गोणीत किंवा मातीच्या भांड्यात ठेवू शकता. यामुळे ती दिर्घकाळ टिकतील आणि खराब होणार नाहीत.
तागाच्या गोणीत पुठ्ठ्याच्या बॉक्ससहित अंडी ठेवल्यास अनेक दिवस ती फ्रेश राहतील.
तसेच मडक्याच्या भांड्यात वाळलेले गवत टाकून त्यामध्ये अंडी ठेवल्यास ती लवकर खराब होत नाहीत. आणि जास्त काळासाठी फ्रेश राहतात.