Strawberry Farming : स्ट्रॉबेरी शेतीला मिळणार चालना, महाबळेश्वरच्या मातीत संशोधन केंद्र

sandeep Shirguppe

स्ट्रॉबेरी संशोधन

महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याने येथील स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळणार आहे.

Strawberry Farming | agrowon

तीन एकर क्षेत्र राखीव

सध्या या प्रकल्पासाठी एकूण तीन एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

Strawberry Farming | agrowon

मे अखेर हे काम पूर्णत्वास

मे अखेर हे काम पूर्णत्वास येणार असून, येथील शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम स्ट्रॉबेरीची लागवड करता येणार आहे.

Strawberry Farming | agrowon

मुख्य पीक स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून, दरवर्षी तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी शेतीची लागवड केली जाते.

Strawberry Farming | agrowon

अनेक प्रकारचे रोग

स्ट्रॉबेरीवर ग्रेमोल्ड, फुलकीडे, माइट, रेड स्टील, बोटरेंसिस, पावडर मेलेड्यू अशाप्रकारचे रोग येतात.

Strawberry Farming | agrowon

रोगप्रतिकारक्षम पिकांची लागवड

शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम पिकांची लागवड करता यावी यासाठी महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे अशी मागणी होती.

Strawberry Farming | agrowon

राहुरी कृषी विद्यापीठ

राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राला हिरवा कंदील दाखविल्याने संशोधन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

Strawberry Farming | agrowon

गहू संशोधन केंदात जागा

गहू गेरवा संशोधन केंद्राची नाकिंदा (ता. महाबळेश्वर) येथे २५ एकर जागा असून, यापैकी तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहत आहे.

Strawberry Farming | agrowon