Anuradha Vipat
आजच्या पिढीला मऊ आणि लुसलुशीत भाकऱ्या बनवणे हे एक कठीण काम वाटते.
आजच्या या पिढीसाठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्याचा वापर करुन भाकऱ्या नक्कीच मऊसुद होतील.
भाकरीसाठी नेहमी ताजे दळलेले पीठ वापरा. जुने किंवा खूप दिवसांचे पीठ टाळा.
पीठ मळण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे पीठ मऊ होते
पीठ मळताना हाताच्या तळव्याचा वापर करून चांगले मळून घ्या. पीठ जितके जास्त मळले जाईल, तितकी भाकरी मऊ होईल.
पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नका. मध्यम मऊ पीठ मळा.
हाताने भाकरी थापत असाल तर हलक्या हाताने आणि कडेने थापा जेणेकरून कडा फाटणार नाहीत. शेवटी भाकरी मध्यम आचेवर भाजा.