Anuradha Vipat
घरच्या घरी हॉटेलसारखी पांढरीशुभ्र, मऊ आणि लुसलुशीत इडली बनवण्यासाठी तांदूळ-डाळीचे प्रमाण आणि पीठ व्यवस्थित आंबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Soft And Spongy Idli Recipe
इडली राईस ,उडीद डाळ ,मेथी दाणे, पोहे, मीठ,पाणी.
तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात घ्या. दोन्हींमध्ये पाणी घालून ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
प्रथम उडीद डाळ आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये थोडे थोडे थंड पाणी घालून एकदम गुळगुळीत आणि हलकी होईपर्यंत वाटून घ्या. तांदूळ आणि भिजवलेले पोहे एकत्र मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटा.
वाटलेले तांदळाचे पीठ उडीद डाळीच्या पिठामध्ये ओता. दोन्ही पिठे हाताने २ ते ३ मिनिटे एकाच दिशेने चांगली फेटून घ्या .आता हे भांडे झाकून ८ ते १० तासांसाठी कोणत्याही उबदार ठिकाणी ठेवून द्या.
इडली पात्राच्या प्लेट्सना थोडे तेल लावून घ्या. प्रत्येक साच्यात इडलीचे पीठ भरा. इडली कुकरमध्ये तळाशी पाणी उकळत ठेवा. १० ते १२ मिनिटे इडली वाफवून घ्या.
गॅस बंद केल्यावर कुकर लगेच उघडू नका. २ ते ३ मिनिटांनी झाकण उघडून प्लेट्स बाहेर काढा. इडल्या थोड्या थंड झाल्यावर चमच्याच्या मागच्या बाजूला थोडे पाणी लावून इडल्या साच्यातून काढा.