Anuradha Vipat
रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे आजकाल सेंद्रिय म्हणजेच ऑरगॅनिक सौंदर्य उत्पादनांची मागणी खूप वाढली आहे.
सेंद्रिय उत्पादने ही पूर्णपणे नैसर्गिक वनस्पती, फळे आणि फुलांच्या अर्कापासून तयार केली जातात.
सेंद्रिय उत्पादनांमध्ये कोणत्याही हानिकारक केमिकल्सचा वापर केला जात नाही. त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचत नाही.
हे नैसर्गिक घटक त्वचेच्या थरांमध्ये खोलवर शोषले जातात. यामुळे त्वचेला अंतर्गत पोषण मिळते आणि चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करू लागतो.
सेंद्रिय उत्पादने अत्यंत सौम्य असतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हे उत्पादने वापरणे अत्यंत सुरक्षित मानले जाते.
यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित राहते. परिणामी, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि काळे डाग येण्याचे प्रमाण खूप कमी होते.
हे घटक त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.