Mahesh Gaikwad
यमेन देशाजवळ अरबी समुद्रात वसेलेलं सोकोट्रा बेट हे 'एलियन आइलंड' या नावाने जगप्रसिध्द आहे. येथे आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राणी पृथ्वीवर कुठेच दिसत नाहीत.
सोकोट्रा बेटावर विचित्र खडक, अनोखी झाडे आणि वाळवंटासारखी रचना आहे . त्यामुळे हे बेट एलियन प्लॅनेटसारखे दिसते.
सोकोट्रा बेटावर ८०० हून अधिक वनस्पती व प्राणीप्रजाती असून यातील ३०% प्रजाती फक्त इथेच आढळतात. त्यामुळे याला जैवविविधतेचा खजिना म्हणतात.
सोकोट्राची वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोने २००८ मध्ये याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले.
हे बेट हजारो वर्षांपासून जगाच्या नजरेतून दूर राहिल्यामुळे इथली नैसर्गिक रचना अजूनही मूळ स्वरूपात टिकून आहे.
'ड्रॅगन ब्लड ट्री' हे या बेटावरचे सर्वात प्रसिद्ध झाड आहे. याच्या फांद्या छत्रीसारख्या असून त्यातून लाल रंगाचा रस निघतो.
यापूर्वी दुर्लक्षित असलेले सोकोट्रा आता निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हळूहळू खुले होत आहे. मात्र इथे पोहोचणे अजूनही कठीण आणि खर्चिक आहे.
सोकोट्रा हे केवळ एक बेट नसून एक वेगळे जगच आहे, जे आपल्या पृथ्वीवरील जैवविविधतेचे अद्भुत उदाहरण आहे. अशा ठिकाणी आपण निसर्गाची खरी ताकद दिसते.