Anuradha Vipat
अंघोळीसाठी साबण किंवा बॉडी वॉश यापैकी काय बेस्ट आहे हे त्वचेचा प्रकार, वैयक्तिक पसंती आणि गरजेवर अवलंबून आहे.
साबण किंवा बॉडी वॉश या दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.
साबण बॉडी वॉशपेक्षा स्वस्त आणि जास्त काळ टिकतो. साबणामध्ये प्लास्टिक पॅकेजिंगचा वापर कमी होतो त्यामुळे तो पर्यावरणासाठी चांगला मानला जातो
एकाच साबणाचा वापर अनेक लोक करत असल्यास त्यावर बॅक्टेरिया किंवा जंतू राहण्याची शक्यता असते.
बॉडी वॉशमध्ये मॉइश्चरायझर आणि कंडिशनिंग घटक असतात जे त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवतात.
बॉडी वॉश बाटलीतून थेट वापरला जात असल्याने तो अधिक स्वच्छ असतो.
साबणाच्या तुलनेत बॉडी वॉश महाग असतो. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर होतो.