Anuradha Vipat
आपल्यापैकी अनेकांना थंडीत जास्त झोप लागते. थंडीच्या दिवसात जास्त झोप लागणे त्यामागे वैज्ञानिक आणि जैविक कारणे आहेत.
थंडीत सकाळी वेळेमध्ये उठण्याचा प्रयत्न जरी केला तरी शरीरात भरलेला आळस तसे करून देत नाही
थंडीत सकाळी लवकर जाग येऊन देखील अनेक वेळ अंथरूणातच पडून राहणेचं आपल्याला आवडते.
असे नेमके थंडीतच का होते. याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? Rआज आपण मागिल कारण पाहूयात.
थंडीत दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याकारणामुळे अनेकांना या काळात प्रचंड झोप येते.
हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते. मेलाटोनिनचे प्रमाण वाढले की शरीराला जास्त थकवा जाणवतो
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो. व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.