Mahesh Gaikwad
दररोज सकाळी भिजवलेला हरभरा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर मग पाहूयात हरभऱ्याचे आरोग्यदायी फायदे.
हरभऱ्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. परिणीमी अॅनिमियाची समस्या टाळता येते.
हरभऱ्यामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिनांमुळे हाडे व स्नायू मजबूत होतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी याचे विशेष फायदे आहेत.
हरभरा फायबरयुक्त घटकाने समृध्द असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. रिकाम्या पोटी सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने व फायबर असतात. रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे दिर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी भूक कमी लागते व वजन नियंत्रणात राहते.
भिजवलेल्या हरभऱ्यातील झिंक व प्रथिने असतात. जे त्वचा चमकदार बनवतात. तसेच यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.
हरभरा व्हिटामिन - बी, सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृध्द असतो. ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते.
दररोज नियमित मूठभर भिजवलेले हरभरे खाऊ शकता. कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास अधिक फायदेशीर आहे.