Women Health : चाळीशीनंतर महिलांनी या आरोग्य तपासण्या करायलाच हव्या!

Mahesh Gaikwad

आरोग्य तपासणी

वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल सुरू होतात. अशावेळी आरोग्याशी संबंधित तपासण्या केल्यामुळे आयुष्य निरोगी राहते.

Women Health Checkup | Agrowon

संपूर्ण हेल्थ चेकअप

वर्षातून एकदा संपूर्ण हेल्थ चेकअप करावे. यामध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. ज्यामुळे संभाव्य समस्यांवर आधीच उपचार करता येतात.

Women Health Checkup | Agrowon

मधुमेह तपासणी

मधुमेह हा हळूहळू वाढणारा आजार असून या संबंधित फास्टिंग शुगर आणि इतर तपासण्या करून घेतल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणता आहे का ते समजते.

Women Health Checkup | Agrowon

हाडांची तपासणी

वयाच्या चाळीशीमध्ये महिलांमध्ये हाडे कमजोर होण्याचा धोका वाढतो. यासाठी बोन डेन्सिटी, कॅल्शियम आणि व्हिटामिन-डी या तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळता येतो.

Women Health Checkup | Agrowon

ह्रदयाची तपासणी

चाळीशीनंतर ह्रदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे ईसीजी आणि इको टेस्टसह कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामुळे ह्रदय निरोगी ठेवता येते.

Women Health Checkup | Agrowon

डोळ्यांची तपासणी

वाढत्या वयामुळे महिलांमध्ये दृष्टीदोषाची समस्या उद्भवते. त्यामुळे डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

Women Health Checkup | Agrowon

कर्करोगाची तपासणी

बऱ्याचदा या वयात महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचा धोक संभवतो. यासाठी मॅमोग्राफी आणि पॅप सिमर या चाचण्या नियमित केल्या पाहिजेत.

Women Health Checkup | Agrowon

मानसिक आरोग्य

चाळीशीमध्ये पुरेशी झोप, तणाव नियंत्रण आणि वजन संतुलित ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यावी आणि व्यायाम व योगा यांचा अंगीकार करावा.

Women Health Checkup | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....