Mahesh Gaikwad
सालक हे लालसर-तपकिरी आणि काटेरी साल असलेले उष्णकटीबंधीय फळ आहे. हे चवीला गोडसर आणि काही प्रमाणात तुरट असते.
लीचीसारख्या दिसणाऱ्या या फळाची साल सापाच्या खवल्यांसारखी असते. त्यामुळे याला स्नेक फ्रूट असेही म्हणतात.
इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रदेशात या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात.
सालक फळ हे नैसर्गिक कामोत्तेजक मानले जाते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते तसेच रक्ताभिसरणही सुधारते.
सालक फळामध्ये व्हिटामिन 'ए' आणि 'सी' असते. तसेच यामध्ये फायबर, लोह, पोटॅशियम आणि मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
यातील पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स स्मरणशक्ती तल्लख करण्यासह तणावही कमी करतात.
सालक फळामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
हे फळ फायबरयुक्त घटकांनी समृध्द असल्याने याच्या सेवनाने पचन सुधारते आणि बध्दकोष्ठतेपासून आराम मिळतो.