Snake Bite Treatment : सर्पदंश झाल्यावर काय करावे? जीव वाचवणारे ५ नियम

Anuradha Vipat

उपाय

सर्पदंश झाल्यावर योग्य माहिती नसणे आणि भीतीमुळे चुकीचे उपाय करणे हे प्राणांतिक ठरू शकते.

Snake Bite Treatment | Agrowon

६० मिनिटे

सर्पदंश झाल्यास पहिले ६० मिनिटे अत्यंत महत्त्वाचे असतात. जीव वाचवण्यासाठी खालील ५ सुवर्ण नियम ताबडतोब पाळा.

Snake Bite Treatment | Agrowon

व्यक्तीला शांत करा

दंश झालेल्या व्यक्तीला अजिबात घाबरू देऊ नका. तिला एका जागी शांत बसवा किंवा झोपवा.

Snake Bite Treatment | Agrowon

घट्ट वस्तू काढून

दंश झालेल्या हाता-पायातील अंगठी, घड्याळ, दागिने, दोरे किंवा घट्ट कपडे ताबडतोब काढून टाका.

Snake Bite Treatment | Agrowon

जखम स्वच्छ करा

जखम साबण आणि स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा. त्यानंतर दंश झालेल्या भागाच्या थोडे वर 'प्रेशर इमोबिलायझेशन' पद्धतीचा वापर करून सुती कापडाने हलकी पट्टी बांधा.

Snake Bite Treatment | Agrowon

रुग्णालयात घेऊन जा

रुग्णाला ताबडतोब शासकीय किंवा मोठ्या रुग्णालयात घेऊन जा. रुग्णाला होणारा त्रास डॉक्टरांना स्पष्ट सांगा.

Snake Bite Treatment | Agrowon

या' चुका कधीही करू नका

जखमेवर ब्लेडने चीरा मारू नका. तोंडने विष चोखून बाहेर काढण्याचा प्रयत्न कधीही करू नका. जखमेच्या वर दोरीने अतिशय घट्ट 'टूर्निकेट' बांधू नका.

Snake Bite Treatment | agrowon

Nose bleeding Home Remedies : नाकातून रक्त आल्यास ताबडतोब करायचे उपाय

Nose bleeding Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...